Skip to content
No Posts Found
new-bapuji-logo

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

SHRI SWAMI VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA’S

(Affiliated to DBATU, Lonere) 

(Affiliated to MSBTE, Mumbai) 

DTE Code : 6468

bsiet logo

Annual Sports

डॉ.साळुंखे इंजिनिअरिंग’ च्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

चित्तथरारक सामने, ऊर्जा आणि कौशल्याने स्पर्धा करणारे खेळाडू, उत्सुकता, खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन अशा उत्साही वातावरणात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अशा सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक एस. व्ही. बनसोडे यांच्या
हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. वीरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्रा. किरण पाटील, रजिस्ट्रार अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषीकेश मेथे, क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा. मृणाल पवार आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
गटनिहाय विजेता, उपविजेता अनुक्रमे असे, क्रिकेट आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग विभाग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग. फुटबॉल : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग विभाग, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग. बुद्धिबळ : आदित्य टक्के, समृद्धी कुईगडे आणि नीलय पोतुडे, दिव्या पाटील. कॅरम : साद मुजावर, सुजल कारंडे, सिद्धिका सावंत, अनुष्का ओतारी आणि स्वयंम खोत, अथर्व खाडे, रक्षिता अंबी, अमृता निकम. टेबल टेनिस : तानिया काटीगर, विराज मुसळे आणि अनन्या पोवार, नीलय पोतुडे. बॅडमिंटन : तानिया काटीगर, सागर भिडे आणि अनन्या पोवार, ऋषीकेश अडुरकर.