Skip to content

Announcement : 

 
new-bapuji-logo

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

SHRI SWAMI VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA’S

(Affiliated to DBATU, Lonere) 

(Affiliated to MSBTE, Mumbai) 

DTE Code : 6468

bsiet logo

ISTE Sponsored National Level Technical Event “IMPULSE 2K25”

डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘इंपल्स 2025’ संपन्न

डॉ. बापूजी साळुंखे ‘इंजिनिअरिंग’मध्ये ‘इंपल्स’ उत्साहात ‘इंपल्स २०२५’ स्पर्धा झाली. स्पर्धांद्वारे तरुणांच्या उत्साहाला विधायक दिशा दिली पाहिजे. कौशल्य विकास व सक्षमता हाच नव्या युगाचा मंत्र आहे, असे मत आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी व्यक्त केले. डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये कोल्हापूर : ‘इंपल्स २०२५ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर. डॉ. देसाई बोलत होते. उद्घाटन डॉ. देसाई, एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय. एस.टी.ई.), नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेमध्ये विविध पदवी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ८१० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात गावडे यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सहभागाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, “शिक्षण, नावीन्याचा ध्यास आणि सुसंस्कार हे संबंधित असून, त्याद्वारे समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. ” या स्पर्धेमध्ये अत्याधुनिक तांत्रिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, क्विझ कॉम्पिटिशन व कोडिंग करण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी परीक्षक, समन्वयक प्रा. प्रवीण भट, प्रा. गीता साळोखे उपस्थित होते. व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक विरेन भिर्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. सुदर्शन महाडिक व प्रा. आरती चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले.

https://smpnewsnetwork.com/National-level-technical-competition–Impulse-2025–concluded-at-Dr–Bapuji-Salunkhe-Engineering-Institute