Scholarship
Degree
ALL GOVERNMENT SCHOLARSHIPS AVAILABLE
Diploma
Dr. Bapuji Salunkhe Merit Scholarship
शासकीय तसेच शासकीय अनुदानित तांत्रिक महाविद्यालये आणि उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने मा. कार्याध्यक्ष यांच्या झालेल्या खर्चानुसार त्यांनी सन २०१४–१५ पासून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी “डॉ. बापुजी साळुंखे गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती” सुरू करण्यात येत आहे.
सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रता :
१. सदर शिष्यवृत्ती ही तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये केंद्रीत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या खुल्या व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तसेच संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती अथवा फी सवलतीचा लाभ न घेतलेल्या मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.
२. सदर शिष्यवृत्तीमार्फत प्रदान करण्यात येणारी रक्कम ही संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षातील लाभ असलेल्या शैक्षणिक शुल्काच्या २५ टक्के इतकी असेल.
सदर शिष्यवृत्ती ही तांत्रिक अभ्यासक्रमातील सर्व अभ्यासक्रमांना प्रथम वर्षामध्ये केंद्रीत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना (प्रति अभ्यासक्रम एक विद्यार्थी) तसेच तांत्रिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या महाविद्यालय स्तरावर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना (प्रति अभ्यासक्रम एक विद्यार्थी) व द्वितीय वर्षाच्या प्रवेशास केंद्रीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (प्रति अभ्यासक्रम एक विद्यार्थी) प्रदान करण्यात येणार आहे.
Smt. Sushiladevi Salunkhe Scholarship
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे या उद्देशाने मा. कार्याध्यक्ष यांच्या झालेल्या खर्चानुसार त्यांनी सन २०१७–१८ पासून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी “सौ. सुषिलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती” सुरू करण्यात येत आहे.
सदर शिष्यवृत्तीची पात्रता :
१. सदर शिष्यवृत्ती ही फक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि. या अभ्यासक्रमासाठी लागू असेल.
२. सदर शिष्यवृत्ती ही तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये केंद्रीत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या खुल्या व इतर मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत अशा विद्यार्थिनींसाठी EBC सवलतीसाठी व इतर मागास प्रवर्गातील भारत सरकार शिष्यवृत्तीची पात्रता असलेल्या विद्यार्थिनींसाठी लागू राहील.
३. सदर शिष्यवृत्तीचे संबंधित लाभार्थी विद्यार्थिनीचे संपूर्ण शैक्षणिक वर्षातील लाभ असलेल्या शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के इतके शुल्क माफ करण्यात येणार आहे.
Criteria for fee waivers/scholarship –
As per the norms of DBT, Maharashtra State, DTE, MSBTE & Other Authorities
Estimated cost of Boarding and Lodging in Hostels – NA