कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व जिल्हा प्रशासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘ नशामुक्ती प्रबोधन पंधरवडा’ अत्यंत उत्साहपूर्ण व जागरूकतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष उपक्रमांतर्गत महाविद्यालयात व्यसनमुक्ती व नशामुक्ती या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित विविध व्याख्याने, संवाद सत्रे, तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील तरुण पिढीला व्यसनमुक्त जीवनाकडे नेणारा संदेश देण्यासाठी या प्रबोधन पंधरवड्यात अनेक नाविन्यपूर्ण व विचारप्रवर्तक उपक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून “नशामुक्त कोल्हापूर” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत कोल्हापूर शहर परिसरात एक भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीतून व्यसनविरोधी घोषणा, जनजागृतीपर फलक व समाज प्रबोधनपर संदेश देण्यात आले.
या पंधरवड्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास सपाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
एन.एस.एस. समन्वयक प्रा. सुरज गायकवाड, व्यसनमुक्ती उपक्रमाचे समन्वयक संभाजी पवार यांनी नियोजन केले. सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
आरोग्यपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम
