शिक्षण तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रगती आणि विकासाला चालना देण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग
अँड टेक्नॉलॉजी आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला.
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटतर्फे संस्थेच्या सचिव प्रा. शुभांगी गावडे व ‘स्वेरी’तर्फे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रा. गावडे म्हणाल्या, ‘परस्पर सहकार्यातून आधुनिक माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी हा करार
महत्त्वपूर्ण ठरेल. या सहकार्याद्वारे आम्ही शिक्षण व व्यावसायिक क्षेत्र अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू.’ प्रा. रोंगे म्हणाले, ‘शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात व्यापक हित साधण्यासाठी आज परस्पर सहकार्य करणे अनिवार्य असून, हा करार विद्यार्थ्यांना ज्ञान व संधींनी समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाला पूरक आहे.’ प्राचार्य विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी सामंजस्य कराराची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट केली. यावेळी ‘स्वेरी’चे विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, समन्वयक प्रा. शिशिर कुलकर्णी उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक, प्रा. अशोक कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि ‘स्वेरी’ यांच्यात सामंजस्य करार
