श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये विजय दिवस साजरा करण्यात आला. भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करून त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य वीरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते संजय पाटील, पंढरीनाथ माने आणि अजित येसणे या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. अशोक कोळेकर यांनी विजय दिवसाचे महत्त्व विषद केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.
डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये १६ डिसेंबर ‘विजय दिवस’ उत्साहात साजरा.
