पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ कुराश स्पर्धेत निहारिका हावळ हिने ५२ किलो गटात सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत निहारिकाने राज्यभरातील इतर स्पर्धकांपेक्षा सरस कामगिरी करीत यश मिळवले. तिची या कामगिरीच्या जोरावर पठाणकोट (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीसाठी निवड झाली. ती बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग
ॲन्ड टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. तिला व्यावसायिक
शिक्षण समूहाचे संचालक प्रा. वीरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
निहारिका हावळचे कुराश स्पर्धेत यश
