महेच्या विरेंद्रची विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट; ग्रामीण भागातून उल्लेखनीय यश
ता. करवीर येथील रहिवासी आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी वीरेंद्र मिठारी याची एकाच वेळी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली.
त्याबद्दल इन्स्टिट्यूट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने महे येथे त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य
वीरेन भिर्डी, महेच्या सरपंच सुवर्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वीरेंद्रला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपसरपंच शामराव कुंभार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. ए. आर. नदाफ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. एस. खाडे, संभाजी पोवार, भैरवनाथ सेवा सोसायटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.
SMP News Network
https://smpnewsnetwork.com/Virendra-from-Mahe-has-achieved-remarkable-success-in-placements-in-various-renowned-companies-from-rural-areas