क्लस्टर युनिव्हर्सिटी’ची स्थापना करणार : कौस्तुभ गावडे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे इचलकरंजीत ‘लॉ कॉलेज’ सुरू होणार
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ‘विचार आणि ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार’ हे ब्रीद घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची महाराष्ट्र, कर्नाटकात वाटचाल सुरू आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण देत सर्वांगीण विकास साधत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम संस्था अविरतपणे करत आहे. कोल्हापुरात संस्था ‘क्लस्टर युनिव्हर्सिटी’ची स्थापना करणार आहे. वर्षभरात कौस्तुभ गावडे इचलकरंजीमध्ये ‘लॉ कॉलेज’ सुरू करण्यात येईल, असे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी आज येथे सांगितले.