डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये ‘उजळले ‘टपाल युग’
सोशल मीडिया, ई-मेल, रिल्स, मेसेजेस अशा अनेक माध्यमांनी गतिमान झालेल्या आजच्या काळामध्ये ‘टपाल युग’ निव्वळ एक स्मृती बनून राहिले आहे. एकेकाळी जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये हितगुज साधणाऱ्या या टपाल युगाच्या स्मृतींना उजाळा मिळाला तो स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये ! इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी आंतरदेशीय पत्रांवर आपल्या भावना व्यक्त करून ही पत्रे आपल्या आजी आजोबांना • पाठवून दिली. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांच्या हस्ते सिनियर पोस्टमन शरद वालावलकर, प्रितेश कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक टपाल दिनानिमित्त अनोखा उपक्रम’ जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखनाचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी टपाल युगाची वैशिष्ट्ये सांगितली. टपाल युगाचा सुवर्णकाळ पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी त्या काळातील आठवणी युवकांसमोर मांडल्या. किशोर कुमार यांनी गायलेले ‘डाकिया डाक लाया’ हे टपाल युगाचे वैशिष्ट्य सांगणारे गाणे सादर करण्यात आले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन प्रा. सुदर्शन महाडिक यांनी केले. समन्वयक प्रा. निखिल जाधव यांनी आभार मानले.