डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंटला प्रतिसाद
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग कंपनीचा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीपणे पार पडला. विविध तंत्रनिकेतन मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील ५०० हून उमेदवारांनी ड्राईव्हमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सक्षम उमेदवारांना वार्षिक ३ लाखांचे पॅकेज ऑफर करण्यात आले.
‘डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी’ पदासाठी उमेदवारांच्या तांत्रिक कौशल्याची तपासणी लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली, असे प्रतिपादन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुरज पवार यांनी केले.
ऑनलाईन टेस्ट, मुलाखत मार्गदर्शन, औद्योगिक भेटी आणि प्रत्यक्ष अनुभव, अनेक कंपन्यांचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हज, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग, कलचाचणी, विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजकांची व्याख्याने. अत्याधनिक माध्यमांचा वापर यामुळे विद्यार्थी यशस्वीपणे प्लेसमेंट ड्राईव्हना सामोरे जात आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी ड्राईव्हचे आयोजन केले. या ड्राईव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. टी. पानसरे यांनी समन्वयन केले.