Skip to content
No Posts Found
new-bapuji-logo

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

SHRI SWAMI VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA’S

(Affiliated to DBATU, Lonere) 

(Affiliated to MSBTE, Mumbai) 

DTE Code : 6468

bsiet logo

Students Excel in B1-Zonal Sports Tournament

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या खेळाडूंनी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन – बी १ झोनच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये वैयक्तिक खेळात वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये स्वयम खोत (९४ किलो), अर्जुन नरसुगडे (७७ किलो), अविनाश ढेरे (६२ किलो) यांनी तिन्ही
गटांत विजेतेपद प्राप्त केले. कुस्ती स्पर्धेमध्ये आयुष उदगट्टी (१२५ किलो), शुभम पाटील (६१ किलो), तर ७० किलो गटामध्ये विघ्नेश कांबळे आणि उंच उडीमध्ये शिवतेज पाटील याने उपविजेतेपद मिळवले.
सांघिक प्रकारांमध्ये मुलींच्या बॅडमिंटन, खो-खो आणि कॅरम
संघाने विजेतेपद, तर टेबल टेनिसमध्ये उपविजेतेपद मिळवले. मुलांच्या टेबल टेनिस संघाने विजेतेपद मिळवले.
यासाठी संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्रा. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक
प्राचार्य वीरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी नियोजन केले. क्रीडा व्यवस्थापक रजिस्ट्रार अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषीकेश मेथे-पाटील, क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा. मृणाल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली.