श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’चा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने झाला. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी उपस्थितीत होते.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ
गावडे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, रजनी मोटे, माहिती अधिकारी वृषाली पाटील, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते. व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. केंद्राच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी केले आहे.
साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये कौशल्य केंद्राचा प्रारंभ
