१४ ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लोकवस्ती विभाजनाच्या संदर्भात लाखो भारतीयांच्या विस्थापनाची आठवण करून देतो. ज्यामध्ये असंख्य लोकांचे प्राण गेले आणि कोट्यावधी लोकांनी आपल्य घरदाराचा त्याग केला. या दिवशी लोकांनी दिलेल्या बलिदानाचा व विभाजनाच्या वेळी झालेल्या वेदना, त्रास व दुःख याचा उजाळा देणे आणि सदर दिवसाच्या इतिहासाची युवकांत जागृती घडवून द्यावी म्हणून दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन” म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) यांच्या तर्फे एक विशेष नाटक तयार करण्यात आले आहे. सदर नाटक विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी आणि विभाजन काळातील घटनांची समज निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या नाटकाची इंग्रजी व हिंदी भाषेतील लिंक :
https://drive.google.com/drive/u/1/folders/1Eakk7hIRSOKIAmkHuytDKuAj4lg-lbHA